पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या वादग्रस्त माहिती पटावरून ब्रिटनच्या संसदेत गदारोळ झाला. २००२च्या गुजरात दंगलीवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करणारी जुनी मुलाखत बीबीसीने प्रसारित करून वाद उकरून काढला. त्यावर ब्रिटनचे हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड रामी रेंजर यांनी बीबीसीवर ताशेरे ओढले. त्यानंतर पाक वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर तोंडसुख घेतले, त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खासदार हुसेन यांना फटकारले.
ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी सुनावले
संसदेत खासदार इम्रान हुसैन यांनी बीबीसीच्या रिपोर्टचा हवाला देत पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर देऊन इम्रान हुसैन यांना गप्प केले. इम्रान हुसैन यांच्या आरोपांवर सुनक म्हणाले की, पंतप्रधान मोदींबाबत बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वक्तव्याशी आणि अशा कोणत्याही अहवालाशी ते सहमत नाहीत. याआधी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड रामी रेंजर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी बीबीसीवर ताशेरे ओढले होते. बीबीसीवर टीका करताना, रेंजर यांनी पक्षपाती वृत्तांकनाचा आरोप केला. त्यांनी ट्विट केले, ‘बीबीसी न्यूजने एक अब्जाहून अधिक भारतीयांना खूप वेदना दिल्या आहेत. हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या भारतीय पंतप्रधानांचा, भारतीय पोलिसांचा आणि न्यायव्यवस्थेचा अपमान आहे.
Join Our WhatsApp Community