BRS leader K Kavitas : दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरण ; BRS नेत्या के. कविता यांच्या अडचणीत वाढ 

भारत राष्ट्र समिती नेत्या के कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत

196
K Kavita यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री (KCR) यांची मुलगी के कविता यांना (CBI) ने गुरुवारी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक केली. गेल्या मंगळवारी न्यायालयाने के कविता यांच्या कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. मागील न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गेल्या सोमवारी न्यायालयाने कविता यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. न्यायालयाचे म्हणणे होते की, त्यांच्याकडून साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचे काम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा मिळाला तर त्या भविष्यातही हे करू शकतात. (BRS leader K Kavitas)

(हेही वाचा – Amit Shah : महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र, तिघांची रिक्षा; अमित शहा यांचा महायुतीवर हल्लाबोल )

दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात

वास्तविक, ईडीचा (ED) आरोप आहे की के कविता या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात सहभागी असलेल्या साऊथ ग्रुपच्या (South Group) सदस्य आहेत. ज्यांच्यावर दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आपला मद्यचा परवाना मिळविण्यासाठी १०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. सीएम अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दिल्ली मद्य धोरणाशी (Liquor scam) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. (BRS leader K Kavitas)

(हेही वाचा –  Raj Thackeray महायुतीचा प्रचार करणार का? काय म्हणाले आशिष शेलार? ) 

कथित भ्रष्टाचार झाल्याचा दावा

मद्य निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा दावा केंद्रीय तपास यंत्रणेने केला आहे. ईडीने आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आणि पक्षाचे अनेक नेते आणि मंत्री यात गुंतले आहेत. के कविता यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावर कविता आणि आपचे म्हणणे आहे की, राजकीय सूडासाठी अशी कारवाई केली जात आहे. (BRS leader K Kavitas)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.