दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह यांचे राज ठाकरेंना आव्हान

91

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यावर लागलीच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला. राज ठाकरे यांनी कायम उत्तर भारतीयांना मारहाण केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, तरच त्यांना अयोध्येत येऊ देऊ, असे म्हटले. त्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्यावर आता खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली आहे.

तोवर अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही

 मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी मला एअरपोर्टवर वैगरे भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, असे बृजभूषण म्हणाले. तसेच उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे. राज ठाकरेंचे आता हृदय परिवर्तन झाले आहे आणि त्यांना अयोध्येला यायचे आहे. राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील, तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही, असे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे. मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, असे स्पष्टीकरण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत दिले.

(हेही वाचा लज्जास्पद… राज्य सरकारने केली फसवी इंधन दर कपात! फडणवीसांनी केली टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.