लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एक महत्वाची लढत होणार आहे. गांधी परिवाराची विरासत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठीत काँग्रेसने (Congress) उमेदवार जाहीर करण्याची हिंमत केली नाही. याठिकणी भाजपच्या वतीने स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता या ठिकाणाहून राहुल गांधी यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. पण या ठिकाणी बहुजन समाज पक्ष यांनी उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे काँग्रेसला जोरदार फटका बसरणार, अशी शक्यता आहे.
२०१९ मध्ये राहु)ल ५५ हजार मताने हरलेले
काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघाला भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत सुरुंग लावला होता. त्या निवडणुकीत भाजपाच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांचा तब्बल ५५ हजार मतांनी पराभव केला होता. आता यंदाच्या निवडणुकीतही येथे स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. भाजपाने स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊन येथे प्रचारही सुरू केला आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. येथून राहुल गांधी निवडणूक लढणार की नाही याबाबत काँग्रेसने (Congress)अजूनही गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अमेठी मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत या लढतीत रंगत आणली आहे. बहुजन समाज पार्टीने अमेठीमधून रविप्रकाश मौर्य यांना उमेदवारी दिली आहे. रविप्रकाश यांनी २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अयोध्या येथून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता बसपाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. बसपाच्या खेळीने इंडि आघाडीची चिंता वाढली आहे. कारण बसपाच्या उमेदवारामुळे दलित आणि ओबीसी मतदार मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे.
mayawati
Join Our WhatsApp Community