कोरोनाकाळात बुद्धांची शिकवण दीपस्तंभासारखी! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिवादन

ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे, त्यांनी मानवजातीला समृद्ध करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

129

मागील वर्षांपासून देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. या कालखंडात देशाची अर्थव्यवस्था संकटात आली. या महामारीत लस हाच प्रभावी उपाय आहे. लसीचे संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांचे आपण आभार मानतो, तसेच जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या फ्रंट लाईन वर्कर्स यांचेही आपण आभार मानतो. मागील वर्षभरात कोरोनाकाळात गौतम बुद्धाची शिकवण आपल्यासाठी दीपस्तंभासारखी ठरली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौतम बुद्धपौर्णिमेनिमित्त जनतेशी संवाद साधला.

काय म्हणाले पंतप्रधान? 

  • बुद्धाने पूर्ण आयुष्य मानवजातीचा संघर्ष पहिला आणि त्यातून मानवजातीला बाहेर काढण्याच्या दृष्टीने शिकवण दिली. तिच शिकवण आपल्यासाठी कोरोना महामारीत दीपस्तंभासारखी ठरली आहे.
  • कोरोनाकाळात देशात आपण बुद्धाच्या शिकवणीनुसार काम करत आहे.
  • सध्या वातावरणात कमालीचा बदल होतोय, पर्यायाने मानवाची राहणीमान बदलत चालली आहे.
  • नद्या, वने धोक्यात आले आहेत. गौतम बुद्धाने कायम निसर्गाच्या संवर्धनाची शिकवण दिली आहे.
  • म्हणूनच पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
  • ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे, त्यांनी एकत्र येऊन मानवजातीला समृद्ध करण्यासाठी एकत्र यावे.
  • विश्वास, प्रेम आणि मानवतावादी असणारे गौतम बुद्ध आज मानवजातीसाठी आदर्श आहेत.

(हेही वाचा : १०वीच्या निकालाचा निर्णय गुगल फॉर्म सर्व्हेनूसारच! सरकारची न्यायालयात कोंडी होणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.