प्रकाश सुर्वे-शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडीओवरून सभागृहात गदारोळ

136

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शितल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ माॅर्फ करुन व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसेच, दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी कल्याणमधून एक आणि दहिसरमधून दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आता याचे पडसाद सभागृहातही उमटताना दिसत आहेत.

शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.

महिलेचे आयुष्य बरबाद होऊ शकते

शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठित महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची माॅर्फिंग झाली आहे. एका महिलेने माध्यमांसमोर येऊन मी चुकीची नाही, असे कितीवेळा स्वत:ला सिद्ध करायचे. यावर कधी कारवाई होणार? या माॅर्फिंगमुळे तिचे आयुष्य बरबाद होईल, ती विवाहित महिला आहे. या व्हिडीओमागचा मास्टरमाईंड लवकरच समोर आणावा, यावर कारवाईचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी केली आहे.

( हेही वाचा: संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र; 500 कोटींच्या घोटाळ्याचा केला आरोप, काय आहे प्रकरण? )

उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते

आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ माॅर्फ करुन व्हिडीओ व्हायरल करणे हा प्रकार आज एका आमदारासोबत झाला. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. शीतल म्हात्रे प्रकरणी आमदार यामिनी जाधव यांनी सभागृहात हे वक्तव्य केले आहे. चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी यामिनी जाधव यांनी केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.