संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास बुधवार, ३१ जानेवारी पासून सुरुवात झाली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर (Budget 2024) केला. यंदाचा अर्थसंकल्प लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सादर होत असल्याने सरकारला तो पूर्ण स्वरूपात मांडता आला नाही.
(हेही वाचा – Budget 2024 : यंदाचा अर्थसंकल्प गरीब, महिला, युवा आणि अन्नदात्यांसाठी; काय म्हणाल्या अर्थमंत्री)
अंतरिम अर्थसंकल्पात (Budget 2024) निर्मला सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा (Budget 2024) करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करावी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या अथवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले होते.
बजेट २०२४ #Budget2024 #InterimBudget2024 #Delhi #FinanceMinister #NirmalaSitharaman #Budget2024 #Modinomics24 #hindusthanpost #latestupdate #trending #hindusthanpostmarathi pic.twitter.com/W3a5TGXTsC
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 1, 2024
(हेही वाचा – GST Collections : अर्थमंत्रालयाने अर्थसंकल्पच्या पूर्वसंध्येला दिली जीएसटीबाबत गुड न्यूज)
निर्मला सीतारामन यांच्या नावावर आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याचा विक्रम आहे.त्यामुळे आजचे अर्थसंकल्पाचे (Budget 2024) वाचन किती वेळ चालेल हा एक चर्चेचा विषय होता. निर्मला सीतारामन यांनी २०२० मधील सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण केले होते. त्यांनी तब्बल २ तास ४२ मिनिटांचे अर्थसंकल्पाचे वाचन केले होते. मात्र, निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतरिम बजेटचे वाचन केवळ ६० मिनिटांत पूर्ण केले आहे.
(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात समावेशासाठी सर्फराझ आणि रजत पाटिदार यांच्यात टक्कर)
करदात्यांसाठी आनंदाची बातमी : नवीन कररचनेनुसार यंदा ७ लाखांच्या उत्पन्नावर कर नाही. #Budget2024 #InterimBudget2024 #Delhi #FinanceMinister #NirmalaSitharaman #Budget2024 #Modinomics24 #hindusthanpost #latestupdate #trending #hindusthanpostmarathi pic.twitter.com/yX61iwKvTE
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 1, 2024
तसेच सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करण्याचा रेकॉर्ड माजी अर्थमंत्री मोरारजी देसाईंच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच १० वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community