निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना पुन्हा मोदी सरकारमध्ये अर्थमंत्रालयाची (Budget 2024) जबाबदारी देण्यात आली असून आता नव्या मोदी सरकारचा ‘100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन’ सुरू झाला आणि सोबतच अर्थसंकल्प तयार करण्याची कसरतही सुरू झाली आहे. आतापर्यंत अर्थसंकल्पाच्या तारखेबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. (Budget 2024)
अधिकृत घोषणा नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नसून निर्मला सीतारामन यांनी १२ जून रोजीच पदभार स्वीकारला, त्यामुळे नियोजनाला थोडा वेळ लागू शकतो. मात्र, अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करण्याच्या तीन तारखांवर चर्चा सुरू आहे. १ जुलै या तारखेची सर्वाधिक चर्चा असून या दिवशी सरकार अर्थसंकल्प सादर करू शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. ८ जुलै देखील एक संभाव्य तारीख आहे ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. २२ जुलै तारखेचीही चर्चा सुरू आहे, मात्र अंतिम तारीख कोणती असेल, यासाठी सरकारच्या घोषणेची वाट पाहावी लागेल. (Budget 2024)
सलग सात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या अर्थमंत्री
बजेटच्या तारखेबाबत होत असलेल्या चर्चेत एक विशेष बाब म्हणजे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करण्याचा सरकार विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सलग सात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. २०१९ च्या निवडणुकीनंतर सीतारामन यांनी एकूण सहा बजेट सादर केले आहेत. २०२४ मध्ये निवडणूक वर्ष असल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतारामन सलग सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडतील. (Budget 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community