केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, मंगळवारी एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबद्दल आनंद व्यक्त करत हा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे घेऊन जाणार असून समाजातील सर्व घटकांची या अर्थसंकल्पात काळजी घेण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. (Budget 2024)
The #BudgetForViksitBharat ensures inclusive growth, benefiting every segment of society and paving the way for a developed India.https://t.co/QwbVumz8YG
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2024
पंतप्रधान म्हणाले की, हा शेतकरी आणि तरुणांना प्रगतीच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यांच्या आर्थिक प्रगतीत सातत्य ठेवण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे. तरुणांना अगणित संधी देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गाला नवे बळ मिळणार आहे. आदिवासी समाज, दलित आणि मागासलेल्या लोकांच्या सक्षमीकरणासाठी भक्कम योजना आणल्या आहेत. या अर्थसंकल्पामुळे महिलांचा आर्थिक सहभाग सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे मोदी म्हणाले. या अर्थसंकल्पामुळे व्यापारी आणि लघु उद्योगांना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. अर्थसंकल्पात उत्पादन आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि गतीही कायम राहील. रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणे ही आपल्या सरकारची ओळख आहे. आजचा अर्थसंकल्प याला आणखी बळ देणारा असल्याचे मोदींनी सांगितले. (Budget 2024)
(हेही वाचा –BMC : महापालिकेतील कंत्राट कामांच्या शोधात काँग्रेस, केला जातो माहिती अधिकाराचा वापर)
या अर्थसंकल्पात सरकारने रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनाची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत आयुष्यातील पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना आमचे सरकार पहिले वेतन देणार आहे. कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणासाठी मदत असो किंवा एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजना असो, हे तरुण, गरीब लोक करतील, माझी मुले-मुली देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करतील. त्यांच्यासाठी शक्यतांचे नवे दरवाजे उघडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Budget 2024)
(हेही वाचा –Union Budget 2024 : केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा; विजय वडेट्टीवार यांची टीका)
पंतप्रधानांच्या मते, आपल्याला प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात उद्योजक घडवायचे आहेत. आम्ही हमीशिवाय मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली आहे. याचा फायदा मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींना होणार आहे. आपण सर्व मिळून देशाला औद्योगिक केंद्र बनवू. देशातील एमएसएमई क्षेत्र हे देशाचे केंद्र बनले आहे. लघुउद्योगांची मोठी ताकद हे आपले महत्त्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कर्जाची सुलभता वाढवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मोदी म्हणालेत. या अर्थसंकल्पात लघुउद्योगांसाठी कर्जाची सुलभता वाढवण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. उत्पादन आणि निर्यात परिसंस्था प्रत्येक जिल्ह्यात नेण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाने स्टार्टअप, इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी अनेक नवीन संधी आणल्याचे मोदींनी सांगितले. (Budget 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community