सोन्याचे (gold ) दर गगनाला भिडले आहेत. आधीच 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं 83 हजार रुपयांहून अधिक प्रति तोळा आहे. बजेटनंतर (Budget 2025) सोनं आणखी महाग होणार की स्वस्त याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये सोनं-चांदींच्या (silver) किंमतींबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. (Budget 2025)
आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) जाहीर होणार आहे. संसदेत शुक्रवारी (31 जानेवारी) सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार (Economic Survey Report), 2025 मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता असून चांदीच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. ऑक्टोबर 2024 मधील जागतिक बँकेच्या एका अहवालाचा दाखला यावेळी देण्यात आला आहे. त्यानुसार या किंमतीमध्ये 2025 मध्ये 5.1 तर 2026 मध्ये 1.7 टक्के घसरण होण्याचा अंदाज आहे. (Budget 2025)
हेही वाचा-गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात; किती झाली LPG ची किंमत ?
तेलांच्या किंमतीमुळे ही घसरण होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या वाढत्या किंमती तसंच कृषी मालासाठीचा स्थिर दृष्टीकोन यामुळे या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. आर्थिक सर्वेक्षणात सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता असून चांदीची किंमत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोहखनिज आणि जस्तच्या किंमतीमध्ये झालेली घसरण हे सोन्याची किंमत कमी होण्याचं कारण मानलं जात आहे. सर्वसाधारणपणे, भारताद्वारे आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतीतील घसरणीचा कल देशांतर्गत चलनवाढीच्या दृष्टिकोनासाठी सकारात्मक आहे, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. (Budget 2025)
हेही वाचा-Rickshaw, Taxi Fare Hike : रिक्षा, टॅक्सीचे नवीन दर लागू ; किती रूपयांनी महागला प्रवास ?
सोन्याच्या किमतीत अपेक्षित घसरण गुंतवणूकदारांच्या मनस्थितीवर परिणाम करू शकते, त्याचबरोबर चांदीच्या किमतीत अपेक्षित वाढ सराफा बाजाराला आधार देऊ शकते, असे आर्थिक सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षाची तयारी करत असताना सरकारनं सराफा बाजारातील किंमतीमधील बदल, चलनवाढ, व्यापार आणि परकीय गंगाजळीवरील परिणाम याचे बारकाईने निरीक्षण करावे, अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे. (Budget 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community