माओवादमुक्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी Maoism ग्रस्त भागासाठी अर्थसंकल्पात ३,४८१ कोटींची तरतूद

45
माओवादमुक्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी Maoism ग्रस्त भागासाठी अर्थसंकल्पात ३,४८१ कोटींची तरतूद
माओवादमुक्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी Maoism ग्रस्त भागासाठी अर्थसंकल्पात ३,४८१ कोटींची तरतूद

माओवादग्रस्त (Maoism) भागात सुरक्षासंबंधी खर्च आणि विशेष योजनांसाठी ३ हजार ४८१ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. २०२४-२५च्या अर्थसंकल्पात (Union Budget 2025) ही तरतूद २ हजार ४६३ कोटी रुपये होती. केंद्र सरकारने माओवादमुक्तीसाठी मार्च २०२६चे लक्ष्य निर्धारित केल्यानंतर आता अर्थसंकल्पात लक्ष्यपूर्तीसाठी साधारणतः हजार कोटी रुपयांनी तरतूद वाढविण्यात आली आहे. (Maoism)

( हेही वाचा : Nashik-Gujarat Highway वर खाजगी बस कोसळली 200 फूट खोल दरीत; 7 जण जागीच ठार

महाराष्ट्रातील गडचिरोली, छत्तीसगड, तेलंगण, ओडिशामध्ये माओवाद्यांकडून हिंसाचार घडवून आणला जातो. सर्वाधिक घटनांची नोंद छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) होते. केंद्र सरकारने या संपूर्ण प्रदेशातून माओवाद (Maoism) संपविण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे. याचा सातत्याने भाजपा (BJP) नेत्यांकडून पुनरुच्चार केला जातो. त्यातच या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीचे बळही देण्यात आले आहे. दि. १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील निधीच्या नियोजनातून याची खात्री पटली आहे. चालू वर्षातील मागील जानेवारी महिन्यात सर्वाधिक माओवादग्रस्त असलेल्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) ४० माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. २०२४चा विचार करता छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी २१९ माओवाद्यांना ठार मारले होते. ओडिशात (Odisha) सहा ठार तर आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली. यात २४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. (Maoism)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.