Modi Government च्या स्थिरतेसाठी बजेट महत्त्वपूर्ण; विरोधक तोंडघशी

134
Modi Government च्या स्थिरतेसाठी बजेट महत्त्वपूर्ण; विरोधक तोंडघशी

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांच्या मनात त्यांना खाली खेचण्याचे मनसूभे तयार करने सुरु आहे. मोदी सरकार अल्पावधीचे आहे. फक्त सहा महिन्यातच हे सरकार कोसळेल, असे विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र मंगळारी मोदी सरकारने बजेट मध्ये सादर केलेल्या घोषणांमधून विरोधकांना चांगलेच तोंडघशी पाडले आहे. कारण आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यासाठी भरघोष प्रमाणात आर्थिक घोषणा केल्यामुळे नितीशकुमार आणि चंद्राबाबू सत्तेत मोदींसोबत कायम राहण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. एवढेच नव्हे तर मोदी, नितीश कुमार आणि चंद्राबाबू मिळून पाच वर्षे सत्तेत कायम राहतील अशी चर्चा राजधानीतील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. (Modi Government)

मोदी सरकारला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा आधार आहे. त्यांच्या पाठिंब्यावरच मोदींना पुढील पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून हेच दोन बाबू मोदींना धोका देतील, अशी भाकितं वर्तवली जात आहे. सरकार फार काळ टिकणार नाही, अशी विधाने केली जात आहे. अर्थसंकल्पातून मोदींनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. सीतारमण यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी अनेक मोठ्या घोषणा करत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना खूष केले आहे. बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य केली नसली तरी त्यांना भरघोष निधी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Modi Government)

(हेही वाचा – Ajit Pawar : “अजितदादांच्या दूरदृष्टीवर तरुणांचा विश्वास…”, काय म्हणाले धीरज शर्मा?)

१५ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर

आंध्र प्रदेशाला तब्बल १५ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. हे पॅकेज जाहीर होत असताना चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी जोरदार बाके वाजवून त्याचे स्वागत केले. पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांच्या दिशेने हात उंचावत सूचक संकेत दिले. (Modi Government)

नीतिश कुमार यांनाही मोदी सरकारने केले खूष

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्या टर्ममधील पहिल्याच अर्थसंकल्पातून सरकारला मजबूत करण्यात यश मिळविले आहे. तर पुढील पाच वर्षे सरकार स्थिर राहील, याची काळजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनसुब्यांना चांगलाच धक्का बसला आहे. (Modi Government)

कारण आंध्र प्रदेशला तब्बल १५ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही दिली आहे. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी भागात पायाभूत सुविधा, रायलसीमा, प्रकाशम आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशातील मागास भागांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. (Modi Government)

नीतिश कुमार यांनाही मोदी सरकारने खूष केले आहे. बिहारमधील रस्ते जोडणी प्रकल्पांसाठी २६ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. सुमारे २१ हजार ४०० कोटी रुपये खर्चुन बिहारमध्ये ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पिरपेंटी येथे २४०० मेगावॉटचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. यांसह दोन्ही राज्यांना अतिरिक्त मदतही केली जाणार आहे. (Modi Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.