कॉंग्रेसचे आता गोवंश प्रेम!

104

भाजपने नेहमीच आपले गोवंश प्रेम नुसते बोलूनच नाही, तर कृतीतूनही दाखवले आहे. गोहत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही भाजपाकडून राबवण्यात आल्या आहेत. मात्र आता कॉंग्रेसनेही हे मनावर घेतले आहे. गोवंशबद्दल असलेलं आपलं हे प्रेम छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवले आहे. 2022-23 च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे शेणापासून बनलेली ब्रीफकेस घेऊन आले. या ब्रीफकेसची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे. या ब्रीफकेसवर संस्कृतमध्ये लिहिले आहे की, ‘गोमय वसते लक्ष्मी’ म्हणजे शेणात लक्ष्मीचा वास असतो.

ही पहिलीच वेळ

अर्थसंकल्प मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या ब्रीफकेसचा वापर करण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. साधारणत: विविध राज्यांचे मुख्यमंत्री अर्थसंकल्पाची प्रत घेऊन जाण्यासाठी चामड्याच्या किंवा ज्यूटच्या ब्रीफकेसचा वापर करत आहेत. ही ब्रीफकेस रायपूर गोकुळ धाम गौठाणमध्ये कार्यरत ‘एक पहल’ महिला बचत गटाच्या महिलांनी तयार केली आहे.

शेण हे लक्ष्मीचे प्रतिक

शेणाची पूड, चुन्याची पूड, मैदा, लाकूड, गवार डिंक यांचे मिश्रणाचा थर लावून 10 दिवसांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आल्याचे या ग्रुपमधील महिलांनी सांगितले. छत्तीसगढमध्ये शेण हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या राज्यातील तीज सणांमध्ये घरे सावरण्याची परंपरा आहे. हे लक्षात घेऊन बचत गटांच्या महिलांनी गोमय ब्रीफकेस बनवली आहे.

( हेही वाचा: आता रेल्वे स्थानकावरच होणार प्रवाशांचा थकवा दूर, वाचा मध्य रेल्वेची अनोखी सुविधा! )

शेतक-यांनाही मिळतोय लाभ

पशुपालकांना फायदा व्हावा हा यामागचा उद्देश आहे. गोधन न्याय योजना 2021 मध्ये राज्यात सुरु झाली. राज्य सरकार पशुपालक शेतक-यांकडून शेण खरेदी करते. त्या बदल्यात त्यांना पैसे दिले जातात. या योजनेअंतर्गत सरकार गायींसाठीही काम करत आहे. राज्य सरकारने यासाठी राज्यभरात वेगवेगळी गौठाणेही बांधली आहेत. यात गाईंची निगा राखून त्यांच्या शेणापासून गांडूळ खत तयार करण्याचे काम केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.