एरवी सभागृहात प्रत्येक मुद्द्याचे टिपण काढत शांत बसणाऱ्या, संयमी स्वभावाच्या देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेताना त्यांच्यातले कवित्व बहरून आले. फडणवीस म्हणाले, ‘मुश्किलें जरुर है मगर, ठहरा नही हूँ मैं… मंजिलों से कह दो अभी पहुँचा नही हूँ मैं…’
राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडेंनी हा अर्थसंकल्प कॉपी, एडिट, पेस्ट वाटला, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हा कॉपी, एडिट, पेस्ट नाही… हा कंट्रोल, अल्ट, शिफ्ट अर्थसंकल्प आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
‘इत्र सें कपडो को महकाना कोई बडी बात नही,
मजा तो तब है, जब आपके किरदार से खुशबू आए…’
मी त्यांना एवढेच सांगतो.
‘दुआ करो कि सलामत रहे मेरी हिंमत
यह एक चिराग कई आँधियों पे भारी है.
मुश्किलें जरुर है मगर, ठहरा नही हूँ मैं…
मंजिलों से कह दो अभी पहुँचा नही हूँ मैं…’
सांगा कोण कुणाचा लव्हर आहे?
जयंत पाटलांच्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, जयंतराव तुम्ही सूर्यकांत डोळस यांच्या मोजक्या दोन वात्रटिका वाचलेल्या दिसतात. त्यांच्या काही वात्रटिका तुमच्याही काळात आल्या होत्या. त्यातील एक वाचून दाखवितो…
दोघांमध्ये तिसरा आला
सांगा कोण कुणाचा लव्हर आहे?
नेमकेचि बोलायचे तर,
प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे…
तिघाडीची झाली आघाडी
तीन-तीन हायकमांड आहेत.
देशी-विदेशी झाले कालबाह्य
बदलत्या काळाच्या,
बदलत्या डिमांड आहेत…
Join Our WhatsApp Community