संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) मंगळवारी म्हणजेच 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष NEET पेपर लीक (NEET Paper Leak) आणि रेल्वे सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. (Budget Session 2024)
हे सत्र सोमवारपासून सुरू होणार असून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 बैठका होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्वपक्षीय (All Party Meeting) बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या माध्यमातून संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात सरकार सहा विधेयके मांडणार आहे. यामध्ये 90 वर्षे जुन्या एअरक्राफ्ट ॲक्टमध्ये बदल करण्याच्या बिलांचाही समावेश असेल. यासोबतच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अर्थसंकल्पाला संसदेत मंजुरी देण्याची मागणी केली जाणार आहे.
(हेही वाचा- Mumbai Heavy Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा)
हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. या अर्थसंकल्पात सरकार अनेक मोठ्या घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. या अधिवेशनात सरकार सहा विधेयके मांडण्याची शक्यता आहे. 23 जुलै रोजी अर्थमंत्री सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज संसदेत राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाने प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या हिताचे अनेक मुद्दे ते संसदेत आक्रमकपणे मांडणार आहेत. (Budget Session 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community