Budget Session 2024 : शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प – अशोक चव्हाण

83
Budget Session 2024 : शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प - अशोक चव्हाण

महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसह महिला व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. (Budget Session 2024)

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. खासदार चव्हाण म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी शहरी व ग्रामीण भागाला समतोल न्याय दिला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिलमाफी, आधारभूत किमतीनुसार कडधान्ये व तेलबियांच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी, कापूस व सोयाबीनचे भाव घसरल्याने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, ई-पंचनामा योजना आदी घोषणांमधून दिलासा देण्यात आला आहे. (Budget Session 2024)

(हेही वाचा – Maharashtra Budget Session : कृषिपंपाचं थकित बिल माफ करणारा आणि महिला, तरुणांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प)

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर, बचत गटांच्या निधीत वाढ, महिलांसाठी १० हजार पिंक रिक्षा आदी निर्णयातून महायुती सरकारने महिलांना भरीव मदत करण्याची भूमिका घेतली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यात ३८ हजारांवरून ६० हजार रुपयांपर्यंत वाढ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदीतून तरूण विद्यार्थ्यांना साह्य होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोलियम उत्पादनांवरील करांमध्ये कपात, संजय गांधी निराधार योजनेत १ हजार रुपयांऐवजी दीड हजार रुपयांचे अनुदान आदींमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. (Budget Session 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.