Budget Session 2024 : भारत टॉप 5 अर्थव्यवस्थांत पोहोचला; राष्ट्रपतींनी केले सरकारचे कौतुक

255
Budget Session 2024 : भारत टॉप 5 अर्थव्यवस्थांत पोहोचला; राष्ट्रपतींनी केले सरकारचे कौतुक
Budget Session 2024 : भारत टॉप 5 अर्थव्यवस्थांत पोहोचला; राष्ट्रपतींनी केले सरकारचे कौतुक

भारतात सर्वांत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला आहे. सलग दोन तिमाहीत विकासदर 7.5 टक्क्यांहून अधिक आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर तिरंगा फडकावला आहे. राममंदिर उभारण्याची इच्छा कित्येक दशकांपासून होती. आज ती पूर्ण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir)कलम 370 (Article 370) हटवणे हा ऐतिहासिक निर्णय बनला आहे. याच संसदेत तीन तलाकविरोधात कायदा करण्यात आला. आपण भारताला टॉप 5 अर्थव्यवस्थेत सहभागी होतांना पाहिले आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. (Budget Session 2024)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : भारतीय संघात निवड झाल्यावर सर्फराज खानची पहिली प्रतिक्रिया)

भारताचे निर्यात क्षेत्र 775 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session 2024) सुरुवातीला केलेल्या अभिभाषणात त्यांनी सरकारच्या कार्याचा लेखा-जोखाच मांडला. मोदी सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतांना राष्ट्रपती म्हणाल्या, ”भारताचे निर्यात क्षेत्र जवळपास 450 बिलियन डॉलरने वाढून 775 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. आधीपेक्षा एफडीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. खादी आणि ग्रामोद्योगच्या उत्पादनाची विक्री चार टक्क्यांनी वाढली आहे. देशाला जीएसटीच्या रुपाने एक देश एक टॅक्स कायदा मिळाला.”

राष्ट्रीय महामार्गाची लांबी 90 हजार किलोमीटर वाढली

डिजीटल इंडियासोबतच (Digital India) फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही गुंतवणुक मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या दहा वर्षांत गावात चार लाख किलोमीटर नवे रस्ते बांधण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गाची लांबी 90 हजार किलोमीटरने वाढून आता 46 लाख किलोमीटर झाली आहे, असेही मुर्मू यांनी सांगितले. (Budget Session 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.