कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी विधानभवन परिसर भाजपने दणाणून सोडला.
दाऊद के दलालोको, जाते मारो सालोंको
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर यांसह भाजपचे आमदार हे विधानभवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारने ‘आम्ही काहीही झाले तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे. तर भाजपने ‘काहीही झाले तरी मलिकांचा राजीनामा घेणारच’, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यानुसार अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपने विधिमंडळाच्या पायरीवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘दाऊद के दलालोको, जाते मारो सालोंको’, अशा घोषणा करत होते.
(हेही वाचा दाऊदच्या घरची धुणीभांडी आधी थांबवा…फडणवीसांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community