राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. बुधवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
( हेही वाचा : RBI चे पतधोरण जाहीर! महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना दिलासा नाहीच, रेपो रेटमध्ये वाढ)
२७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष,अँड राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, ॲड.आशिष शेलार, अमीन पटेल बैठकीला उपस्थित होते.
विधिमंडळाचे २०२३ चे पाहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च २०२३ रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतील.
Join Our WhatsApp Community