Budget Session : ८ मार्च रोजी सभागृहाची बैठक रद्द; ७ मार्चला होणार महिला सक्षमीकरणावर चर्चा

62
मुंबई प्रतिनिधी: 
विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ८ मार्च २०२५ रोजी होणारी सभागृहाची बैठक (House meeting cancelled) रद्द करण्यात आली आहे. याऐवजी, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवरील चर्चा उद्या, ७ मार्च २०२५ रोजी होणार आहे. (Budget Session)
गटनेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय
२३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्चला सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी ‘जागतिक महिला दिन’ (International Women’s Day) आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी’ वर्षाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या शाश्वत विकास आणि सक्षमीकरणावर चर्चा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि, गुरुवार अध्यक्षांच्या दालनात सर्व गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत विचारविनिमय करून ८ मार्च ऐवजी ७ मार्च रोजी ही चर्चा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – गुजरात मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी Pravin Darekar यांच्या अध्यक्षतेखाली समिती; महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा)

८ मार्च रोजी सभागृहाची बैठक होणार नाही
नवीन निर्णयानुसार शनिवार, ८ मार्च रोजी सभागृहाची बैठक घेतली जाणार नाही. महिला सक्षमीकरण व शाश्वत विकासावरील प्रस्ताव शुक्रवार, ७ मार्च रोजीच सभागृहात सादर केला जाणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.