अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले; १७ जुलैला पावसाळी अधिवेशन

127

तब्बल १८ दिवस चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या काळात चाललेले हे अधिवेशन खऱ्या अर्थाने वादळी ठरले. यापुढचे पावसाळी अधिवेशन सोमवार, १७ जुलैपासून मुंबईत होणार आहे.

अधिवेशन समाप्तीची घोषणा करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे कामकाज एकूण १८ दिवस, प्रत्यक्ष १६५ तास ५० मिनिटे चालले. नियमित बैठकीपैकी ४ तास ५१ मिनिटांचा वेळ वाया गेला. दिवसाचे सरासरी कामकाज ९ तास १० मिनिटे चालले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात २ हजार ५५६ लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. त्यापैकी ५३५ स्वीकृत झाल्या. त्यातील १४५ सूचनांवर चर्चा झाली. शिवाय ७ हजार ९८१ तारांकित सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ५०३ स्वीकृत, तर ५५ उत्तरित झाल्या.

आमदारांच्या उपस्थितवर नजर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ९४.७१ टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ५३.२० टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ८०.८९ टक्के इतके होते. यापुढचे अधिवेशन मुंबईमध्ये सोमवार, १७ जुलै २०२३ पासून सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

(हेही वाचा – ‘त्या’ प्रकरणात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल; फडणवीसांची विधान परिषदेत माहिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.