राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधीमंडळाला चोरमंडळ म्हटले असलयाने मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय राऊतांच्या विधानावर सत्ताधारी आक्रमक झाले असून हक्कभंग प्रस्तावच मांडला आहे. दरम्यान, भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका करताना ‘भाडखाऊ’ शब्द वापरल्याने एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी हा शब्द मागे घेण्याची मागणी केली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात सभागृह अनेक वेळा तहकूब करण्यात आले.
( हेही वाचा: विधिमंडळाचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख केला असेल तर योग्य ती कारवाई करा- अजित पवार )
Join Our WhatsApp Community