-
प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्च ते बुधवार, दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाईल. विधानभवन, मुंबई येथे रविवारी विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. (Budget Session)
(हेही वाचा – महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता Trimbakeshwar Temple प्रशासनाचा मोठा निर्णय)
या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आणि विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. (Budget Session)
(हेही वाचा – Ashish Shelar : छत्रपती शिवरायांच्या ‘या’ 12 किल्ल्यांना जागतिक वारसास्थळे बनवणार; महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिससाठी रवाना)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत शनिवार, दि. ८ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी असूनही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. तसेच, दि. १३ मार्च २०२५ रोजी होळीच्या निमित्ताने विधिमंडळाच्या कामकाजाला सुट्टी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (Budget Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community