लोकाभिमुख योजनांना चालना देणारा अर्थसंकल्प; कौशल्य विकास मंत्री Mangalprabhat Lodha यांचे प्रतिपादन

रोजगारनिर्मितीला गती देणाऱ्या योजनांवर भर

54
मुंबई प्रतिनिधी:
Mangalprabhat Lodha : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारा असून, विकासाची गंगा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणारा आहे, असे मत कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. “हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून, विशेषतः रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले. (Mangalprabhat Lodha)
नवीन पिढीसाठी रोजगार संधी – ‘नाविन्यता नगर’ उभारणी
नव्या पिढीला रोजगाराच्या संधी (Employment opportunities) मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, नवी मुंबई येथे तब्बल २५० एकर क्षेत्रावर ‘नाविन्यता नगर’ (इनोव्हेशन सिटी) उभारण्यात येणार आहे. यामुळे हजारो तरुणांना नव्या तंत्रज्ञानावर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

(हेही वाचा – कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे आश्वासन)

महिला सक्षमीकरणासाठी AI प्रशिक्षण
कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (Skills University) माध्यमातून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना कौशल्य विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे महिलांना जगभरात उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील.
राज्य सरकारचा भर – नाविन्यता आणि रोजगार वाढ
राज्याला पुढील आर्थिक टप्प्यावर नेण्यासाठी कौशल्य विकास, नाविन्यता आणि उद्योजकता हे तीन महत्त्वाचे घटक असतील, असे मंत्री लोढा यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.

(हेही वाचा – “विकसित भारत-विकसित महाराष्ट्र” संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प; अर्थमंत्री Ajit Pawar यांचे विधान)

उद्योजकतेला चालना देण्यासाठी ठोस पावले
या अर्थसंकल्पात (Budget Session 2025) नवीन स्टार्टअप्सना मदतीसाठी विशेष निधी, कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार आणि तरुण उद्योजकांसाठी सहज कर्ज उपलब्धतेवर भर देण्यात आला आहे. यामुळे तरुण वर्गाला स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.
समाजाच्या सर्व स्तरांसाठी संधी उपलब्ध करणारा अर्थसंकल्प
मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, राज्यातील तरुण, महिला आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार आहे. रोजगारनिर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि या नव्या योजनांमुळे महाराष्ट्राला नाविन्यपूर्ण विकासाचा वेग मिळेल.”

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.