15 डिसेंबरपासून सुरू होणार बैलगाडा शर्यत?

132

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील असलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी, 7 डिसेंबर रोजी अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या संदर्भातील पुढची सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार आहे. बैलगाडा शर्यतीबाबत 15 डिसेंबरला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे, असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

केरळ आणि तमिळनाडू या राज्यांची बाजू ऐकून घेतली

खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, या व्हिडिओत त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मागच्या आठवड्यात याबाबत सुनावणी झाली होती, यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केरळ आणि तमिळनाडू या राज्यांची बाजू ऐकून घेतली. महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत जो कायदा केला होता, त्याला आव्हान देणारी याचिका पेटा या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर देखील सुनावणी घेतली जावी, अशी विनंती केली जात होती. तसेच आजवर झालेली सुनावणी या सगळ्याबाबत येत्या 15 डिसेंबरला पुढील सुनावणी निश्चित केली आहे.’ राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते, त्यानंतर खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातही शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

(हेही वाचा जेएनयूत अवतरली ‘बाबर’ची औलाद! म्हणतेय…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.