विधानसभेच्या सात जागांसाठी येत्या ५ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. ८) दिली. ज्या जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे, त्यात त्रिपुरामधील दोन आणि केरळ, झारखंड, प. बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. परंतु यामध्ये महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या दोन लोकसभा क्षेत्रात निवडणुका घोषित झाल्या नाहीत.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्च रोजी निधन झालं. तर केरळाचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं निधन १८ जुलैला झालं. आज देशभरात पाच जागांसाठी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र पुणे आणि चंद्रपूर जेथे बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या लोकसभा तशाच राहिल्या आहेत.
(हेही वाचा – Smriti Irani : ‘गांधी कुटुंबात हिंमत असेल तर…’; स्मृती इराणींचा विरोधकांवर जोरदार पलटवार)
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे अलिकडेच निधन झाले होते. ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या जागेसाठी मतदान होणार आहे. तर झारखंडमधील डुमरीचे आमदार जागरनाथ महातो यांचे निधन झाल्यानंतर डुमरी मतदारसंघासाठी निवडणूक घेणे आवश्यक ठरले होते.
त्रिपुरामधील ज्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे, त्यातील बोक्सानगरमध्ये समसुल हक यांचे निधन झाल्याने तर धानपूरमध्ये प्रतिमा भौमिक यांनी राजीनामा दिल्याने मतदान घेणे गरजेचे ठरले होते. सात मतदारसंघात ५ सप्टेंबरला मतदान होणार असून ८ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community