कसाबा पेठ आणि चिंचवड विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, येत्या फेब्रुवारी महिन्यात मतदान

by poll election 2023 announced for kasba peth and chinchwad
कसाबा पेठ आणि चिंचवड विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, येत्या फेब्रुवारी महिन्यात मतदान

महाराष्ट्रातील दोन विधानसभेतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By Poll Election) जाहीर झाली आहे. कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन विधानसभेच्या जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. याबाबत माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. आता या दोन्ही जागेवरील निवडणूक बिनविरोधी होतेय का? हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी कबसा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. तर चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचेही नुकतेच निधन झाले. या जागेवरील आता पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

माहितीनुसार, उमेदवारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल. उमेदवारीसाठी आलेल्या अर्जांची छाननी ८ फेब्रुवारीला होईल, तर १० फेब्रुवारीला अर्ज परत घेण्याची तारीख असेल. त्यानंतर २७ फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया होईल आणि २ मार्चला मतमोजणी होईल.

(हेही वाचा – Assembly Elections 2023: त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी, तर नागालँड, मेघालयामध्ये २७ फेब्रुवारीला निवडणुका होणार)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here