Assembly Election वर सी व्होटर्सचा सर्व्हे; कोणाची चिंता वाढवली? 

124
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) मतदानाला अवघे २० दिवस बाकी आहेत, अशा वेळी सी व्होटर्सने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये या विद्यमान सरकारच्या बाबत जनतेचे मत जाणून घेण्यात आले आहे. तसेच विद्यमान मुख्यमंत्री त्यांच्याविषयी जनभावना समजून घेण्याचा प्रयत्न घेण्यात आला.
20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील सी व्होटर्सचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये, सध्याच्या भाजप-शिंदे सरकारवर आपण नाराज आहात का आणि हे बदलण्याची आपली इच्छा आहे का? या प्रश्नावर 51.3 टक्के लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे. 3.7 टक्के लोकांनी आमच्या मनात या सरकारच्या विरोधात राग आहे, मात्र हे सरकार बदलण्याची इच्छा नाही, असे म्हटले.
41.0 टक्के लोकांनी सांगितले की, ते या सरकारवर रागावलेले नाही आणि बदलण्याची त्यांची इच्छा नाही. अर्थात 41 टक्के लोकांना पुन्हा भाजप-शिंदे सरकार हवे आहे. तसेच 4% लोक म्हणाले, सध्या काहीही सांगू शकत नाही. मुख्यमंत्री पदासाठी त्यांची पसंती कुणाला, असा प्रश्न विचारला असता, 27.6 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे, असे उत्तर दिले. 22. 9 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. तर 10.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली. याशिवाय, 5.9 टक्के लोकांनी शरद पवार तर 3.1 %  लोकांनी अजित पवारांना पसंती दिली. (Assembly Election)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.