CAA Act : केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात CAA लागू करणार ?

या कायद्यात कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही, मग तो कोणताही धर्म असो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शनिवारी (२४ फेब्रुवारी) सांगितले होते की सीएए लागू करण्याचे नियम आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जारी केले जातील.

252
CAA Act : केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात CAA लागू करणार ?

नागरिकत्व सुधारणा कायदा नियम म्हणजेच सीएए (CAA Act) मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएएचे सुधारित नियम मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू केले जाऊ शकतात. सीएए लागू करण्यासाठी सरकारने एक पोर्टलही तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – Bhayandar Fire : भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग, काही जण जखमी)

काय आहे सीएए कायदा ?

नागरिकत्व सुधारणा कायदा नियम (सीएए) (CAA Act) अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन, जे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आले आहे त्यांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने नियम तयार असून ऑनलाइन पोर्टलही तयार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी अर्जदारांनी प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे वर्ष सूचित करणे आवश्यक आहे. अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत.

(हेही वाचा – EX Judge Ajay Khanwilkar : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश खानविलकर यांची लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती)

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होणार – अमित शाह

या कायद्यात कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व (CAA Act) काढून घेण्याची तरतूद नाही, मग तो कोणताही धर्म असो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शनिवारी (२४ फेब्रुवारी) सांगितले होते की सीएए लागू करण्याचे नियम आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जारी केले जातील आणि लाभार्थ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. कोलकाता येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत बोलताना शहा म्हणाले की, भाजप सीएए लागू करण्यासाठी वचनबद्ध आहे. (CAA Act)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.