- प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्षातील सर्वच मोठ्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांसोबत बोलताना राज्य मंत्री मंडळाचा अंतिम फॉर्मुला ठरला असल्याचे जाहीर केले. मात्र महायुतीचे नेते आपल्या पक्षातील कोण मंत्री बनणार असल्याचे ठरविणार असल्याचेही स्पष्ट केले. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणत्याही प्रकारचा तिढा नाही. माध्यमांनी ज्या बातम्या चालवल्या त्या खऱ्या नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
(हेही वाचा – Universal Health Coverage Day म्हणजे काय ? का साजरा केला जातो हा विशेष दिवस ?)
दिल्लीत अजित पवार हे त्यांच्या कामासाठी तर मी माझ्या कामासाठी आलो आहे. त्यामुळे येथे आमची भेट झाली नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या दिल्लीत काम नसल्यामुळे ते आले नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी भेटीनंतर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले ‘आपला अमूल्य वेळ, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार. गेल्या १० वर्षांत तुमच्या पाठिंब्याने महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आता तुमच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचे ध्येय आहे. तुम्ही आमच्या सारख्या करोडो भाजपा कार्यकर्त्यांना आणखी कठोर परिश्रम करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत आहात. ‘आमच्या पक्षाच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल, या विषयी बावनकुळे आणि मी आमच्या नेत्यांची बोललो आहे. तशी एक यादी देखील आम्ही वरिष्ठांना दिली आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ आम्हाला कळवतील’, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी घेतली शाह यांची भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदेतील कार्यालयात अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी ऊस प्रश्न घेऊन त्यांना भेटलो असल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच मंत्री मंडळ विस्तार १४ डिसेंबरला होणार असल्याचेही स्पष्ट केले.
(हेही वाचा – Hindus in Bangladesh : हिंदूंवरील हल्ल्यांच्या ८८ घटना घडल्या; बांगलादेशने दिली कबुली)
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मूर्ती भेट
देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकूण ७ नेत्यांच्या भेटी घेतल्या. या सदिच्छा भेटीतही त्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दिल्लीत अनोखे दर्शन घडवले.
- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना दिली विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली छत्रपती शिवरायांची मूर्ती
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली वीर सावरकरांची मूर्ती
- भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिली गाय-वासरुची मूर्ती
- केंद्रीय मंत्री राजनाथसिंग आणि नितीन गडकरींना दिली सिद्धीविनायकाची मूर्ती
हेही पहा –
Join Our WhatsApp Community