Cabinet Design 2025: केंद्राकडून महाराष्ट्रातील गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गासह तीन मोठ्या प्रकल्पांना मंजूरी

70

Cabinet Design 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या ८,६५८ कोटी रुपये खर्चाच्या ४ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या ३ राज्यांमधील १५ जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प पसरलेले असून, यामुळे भारतीय रेल्वेच्या सध्याच्या मार्गात सुमारे १२४७ किलोमीटरची वाढ होणार आहे. (Cabinet Design 2025)

तसेच छत्तीसगडमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने ६१५ किमी लांबीचा नवीन रेल्वे मार्ग उभारण्यासाठी ८,७४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याला शुक्रवारी ०४ एप्रिलला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या मार्गावरील रस्ते वाहतुकीच्या तुलनेत या नवीन रेल्वे मार्गामुळे देखभाल खर्चात २,५२० कोटी रुपयांची बचत होईल. हा देशातील सर्वात मोठ्या रेल्वे प्रकल्पांपैकी एक असेल, अशी माहिती मंत्री अश्विनी वैष्णव (Minister Ashwini Vaishnav) यांनी याची घोषणा करताना सांगितले.

(हेही वाचा – दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण : CM Devendra Fadnavis यांची तत्काळ कारवाई; चौकशीसाठी समिती गठीत)

ओडिशात ३,९१७ कोटी रुपये खर्चाचा २७७ किमी लांबीच्या प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे संबलपूर आणि जरापाडा दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग जोडला जाणार आहे. तर चौथा प्रकल्प ओडिशातील असून, येथील झारसुगुडा – ससोन दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग जोडला जाईल.

या प्रकल्पांमुळे रेल्वेची (Railway Project) वहन क्षमता वाढणार असून प्रवाशांना अधिक चांगली सेवा आणि सुविधा मिळणार आहेत. तसेच, व्यस्त मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नवीन भारता’च्या दृष्टिनुसार, या प्रकल्पांमुळे या भागातील लोकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत मिळणार आहे. ज्यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

(हेही वाचा – Waqf Amendment Bill चे समर्थन केले म्हणून वृद्धाला धर्मांध मुस्लिम कट्टरपंथींकडून मारहाण; रिजवान आणि नौशादसह ३ जणांना अटक)

राज्यातील गोंदिया – बल्हारशाह : रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प
गोंदिया – बल्हारशाह (Gondia – Balharshah Railway Project) हा महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २४० किमी लांबीचा हा प्रकल्प असून यासाठी ४,८१९ कोटी रुपये खर्च येईल. यामुळे या भागात रेल्वेची क्षमता वाढेल. यामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल. तसेच या प्रदेशातील अर्थव्यवस्थेलादेखील चालना मिळेल. या प्रकल्पामुळे भारतातील उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक आणखी वाढण्यास मदत होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.