Cabinet expansion: नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे किती मंत्री ? शिवसेनेचा बडा नेता म्हणाला …

188
Cabinet expansion: नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे किती मंत्री ? शिवसेनेचा बडा नेता म्हणाला ...
Cabinet expansion: नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे किती मंत्री ? शिवसेनेचा बडा नेता म्हणाला ...

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचे (Cabinet expansion). मंत्रिपदासाठी तीनही पक्षातील अनेक आमदार इच्छूक आहेत. त्यामुळे मंत्रिपद कोणाला मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा- Sambhal Violence : संभलमधील पोलिसांच्या कारवाईचे पत्नीने कौतुक केले म्हणुन पतीने दिला ‘तिहेरी तलाक’

शिवसेना (Shivsena) शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला नव्या मंत्रिमंडळात किती मंत्रिपद मिळणार? हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, या विषयावर बोलताना शिवसेना नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “मंत्र्यांचा शपथविधी येत्या 12 तारखेला होईल. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं याचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आमदारांनी पहिल्याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्व शिवसैनिकांना, आमदारांना आणि नेत्यांना मान्य असेल.” असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. (Cabinet expansion)

हेही वाचा-रशिया-युक्रेनमध्ये भारताच्या माध्यमातून चर्चा; S. Jaishankar यांची माहिती

राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी शिवसेनेने आपल्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. या यादीत दोन माजी मंत्र्यांचे नाव वगळून दोन नविन चेहरे येण्याची शक्यता आहे. महायुतीत शिवसेनेला 13 ते 14 मंत्रीपदे मिळतील, असे मानले जात आहे. त्यापैकी 10 ते 12 मंत्री या आठवड्यात शपथ घेणार आहेत. (Cabinet expansion)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.