महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion Maharashtra) दि. १५ डिसेंबर रोजी नागपुर येथे विस्तार झाला. त्यावेळी ३३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याव्यतिरिक्त वर्धा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी ही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
( हेही वाचा : मुसलमान म्हणतात, काँग्रेस आणि शरद पवारांनी UBT सोबतचे संबंध तोडावेत)
दरम्यान रामटेक विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच दापोली विधानसभा मतदारसंघातील आमदार योगेश कदम यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याव्यतिरिक्त भाजपाच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community