एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन होऊन 40 दिवस झाले तरीही मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. त्यावरुन विरोधी पक्षनेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र अखेर मंगळवारी 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता राजभवनात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
भाजपचे हे आमदार घेऊ शकतात शपथ
भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांचा समावेश आहे. या संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते.
( हेही वाचा: डिनर डिप्लोमसी; भाजपच्या संभाव्य ९ मंत्र्यांना फडणवीसांकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण )
शिंदे गटाकडून यांना मिळू शकते संधी
शिंदे गटातील 9 आमदार मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील. हाती आलेल्या माहितीनुसार, आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना मंत्रिपद मिळू शकते. त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे या आमदारांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानले जात आहे.
Join Our WhatsApp Community