शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) तारीख अखेर ठरली आहे. त्यासाठी मंत्रालयातून ‘राजभवन’ला फोन गेला असून, १८ किंवा १९ जूनला विस्तार होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
दुसरा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) करताना भाजपाच्या तीन, तर शिवसेनेकडील पाच मंत्र्यांना नारळ द्यावा, अशी शिफारस केंद्रीय नेतृत्त्वाने केली. परंतु, एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांना बाजूला करण्यास साफ नकार दिला आहे. सोमवारी (१२ जून) दिल्लीमध्ये वरिष्ठांची भेट घेऊन त्यांनी आपला निर्णय कळवला. त्यानंतर दिल्लीश्वरांनी आहे त्या स्थितीत विस्तार करण्यास सहमती दर्शवली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेची मुदत संपुष्टात यायला केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने आता पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) केला जाईल. त्यात एकूण २१ मंत्री शपथ घेतील. त्यातील १४ कॅबिनेट, तर ७ राज्यमंत्री असतील. कॅबिनेट मंत्रिपदांपैकी भाजपाला १०, तर शिवसेनेच्या वाट्याला ४ मंत्रीपदे येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्यातील दोन पदे अपक्ष आमदारांना सोडणार आहेत.
(हेही वाचा – Biporjoy Cyclone : गुजरात राज्याला ऑरेंज अलर्ट जारी; ६७ रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना)
राज्यमंत्री पदांचा विचार करता भाजपामधून ४ आणि शिवसेनेकडून तीन आमदार शपथबद्ध होतील, असे कळते. भाजपमधून माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर, माधुरी मिसाळ, किसन कथोरे, राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर; तर शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, यामिनी जाधव, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नावे (Cabinet Expansion) समोर येत आहेत.
जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होणार?
– सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्री आहेत. त्यातही मोजक्याच मंत्र्यांवर अनेक खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मदतीला राज्यमंत्री नसल्याने अधिवेशन काळात त्यांच्यावर कामाचा मोठा ताण येतो.
– पालकमंत्री म्हणूनही एका मंत्र्याकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक जिल्हे आहेत. त्याचा ताण जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेवर येत आहे.
– शिवाय मंत्रिमंडळ विस्तार राखडल्याने इच्छुक आमदारांमधील निराशा वाढत आहे. आता जून महिन्यात विस्तार झाला, तर हे सगळेच प्रश्न मार्गी लागतील.
– सध्याच्या मंत्रिमंडळात आणखी २० मंत्र्यांची भर पडली की जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होण्याचीही शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community