महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखी १० असे मिळून एकूण २२ दिवस लागले. ५ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात (Cabinet Expansion) ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये २० नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक माजी मंत्र्यांना, महायुतीमधील मोठ्या नेत्यांना या वेळी संधी देण्यात आलेली नाही. मोठ्या नेत्यांना पक्षांने का डावलले, या प्रश्नावर नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. ,
(हेही वाचा- Bangladesh Violence : सरकार पुरस्कृत हिंदूंवरील निर्घृण अत्याचार हाच बांगलादेशाचा इतिहास)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या समाजांना, जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले आहे. अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणांमुळे मंत्रिमंडळात घेतले जात नाही. उदाहरणार्थ पक्षाने एखाद्या नेत्याला वेगळी जबाबदारी द्यायचे ठरवले असेल, तर त्या नेत्याला आम्ही मंत्रिमंडळात घेत नाही. भाजपात कोणाला पक्षात मोठी जबाबदारी द्यायची असेल, तर आम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत नाही. तसेच असेही असू शकते की, एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणे टाळलेले असू शकते.
आम्ही आमच्या मंत्रीमंडळात वेगवेगळ्या समाजांना स्थान दिले आहे. ४० टक्के नवे नेते या मंत्रिमंडळात आहेत. सर्व प्रकारचे चेहरे आहेत. जुने-जाणते नेते देखील या मंत्रिमंडळात आहेत. आम्ही अनेक महिलांना देखील संधी दिली आहे. वेगवेगळ्या समाजांना संधी दिली आहे. ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे. आमचे मंत्रिमंडळ सर्वसामावेशक आहे, असे देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. (Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community