राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ११ पालक सचिव अद्याप त्यांच्या नियुक्त जिल्ह्यांत गेले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीच्या (Cabinet Meeting) सुरुवातीलाच त्यांनी यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत तात्काळ सर्व पालक सचिवांनी जिल्ह्यांत जाऊन आवश्यक बैठकांचे आयोजन करण्याचे आदेश दिले.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्रींसोबत पालक सचिवांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या सचिवांना जिल्ह्यांमध्ये जाऊन विकासकामे, योजनांची अंमलबजावणी आणि स्थानिक समस्या समजून घेण्याचे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, अनेक पालक सचिव अजूनही त्यांच्या जिल्ह्यांत पोहोचलेले नाहीत, त्यामुळे प्रशासनावर परिणाम होत आहे, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Donald Trump यांनी ॲल्युमिनिअम, पोलादाच्या आयातीवर लावलं २५ टक्के शुल्क)
मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित सचिवांनी त्वरित जिल्ह्यांत जाऊन तेथील अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधावा आणि विकासकामांचा आढावा घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, यापुढे अशा दुर्लक्षाबाबत कोणतीही सबब खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) दिला.
पालक सचिवांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवणार असून, पुढील मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) त्यांचा अहवाल सादर करावा, असेही त्यांनी आदेश दिले. राज्याच्या प्रशासकीय कामकाजात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) ठणकावून सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community