Cabinet Meeting: राज्यातील पोलीस दलात AIचा वापर; ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ; राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

वैद्यकीय विभागात तात्पुरत्या स्वरुपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्यात येणार आहे तसेच यापुढे मालमत्ता विद्रुपीकरण करणाऱ्यांसाठी गृह विभागाने दंड वाढवला असून एक वर्षाचा कारावास होईल, असेही यावेळी सांगितले आहे.

190
Cabinet Reshuffle and Expansion : राज्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार लवकरच; कुणाला मिळणार संधी?

केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी करणार आहे. त्याआधी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत (Cabinet Meeting) राज्य सरकारने १७ मोठे निर्णय घेतले. राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला ५० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणुकांची आणि आचारसंहितेची घोषणाही यावेळी करण्यात येणार आहे. १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी भागभांडवलीची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे. वैद्यकीय विभागात तात्पुरत्या स्वरुपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्यात येणार आहे तसेच यापुढे मालमत्ता विद्रुपीकरण करणाऱ्यांसाठी गृह विभागाने दंड वाढवला असून एक वर्षाचा कारावास होईल, असेही यावेळी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने संस्कृत, तेलगु, बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसच्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला चीनकडून देणग्यांची खैरात; FCRA परवाना रद्द; काँग्रेस-चीन संबंध? )

लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी होणार आहे. यामुळे रविवारपासून राज्य सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेता येणार नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहेत. (Cabinet Meeting)

मंत्रिमंडळ बैठकीतील ‘ते’ १७ मोठे निर्णय
– राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी (उद्योग विभाग)
– तात्पुरत्या स्वरुपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार (वैद्यकीय शिक्षण विभाग)
– मालमत्ता विद्रुपीकरण आता एक वर्षाचा कारावास. दंडातही वाढ (गृह विभाग)
– १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता (विधि आणि न्याय)
– संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार (सांस्कृतिक कार्य)
– शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण (सांस्कृतिक कार्य)
– विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
(इतर मागास)
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी आणि मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ
-हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीनहोल कडे योजना (सामाजिक न्याय विभाग)
– संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार (गृह विभाग)
– राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार (गृह विभाग)
– ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ, ५० कोटी अनुदान (परिवहन विभाग)
– भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप (महसूल विभाग)
– संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार (गृह विभाग)
– वृद्ध साहित्यिक कलाकारांना ५ हजार रुपये मानधन (सांस्कृतिक कार्य)
– राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर (सामान्य प्रशासन विभाग)
– श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित (महसूल आणि वन)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.