‘मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन’, शिंदे गटाच्या मंत्र्याचे विधान

141

राज्यात सध्या उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तुंबळ वाक् युद्ध सुरू आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेचे पक्ष चिन्ह कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठे विधान केले आहे. मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन, असे सत्तार यांनी म्हटल्याने सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत.

कार्यकर्त्याला कसलीही भीती नसते

मला कसलीही चिंता नाही. मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला कोणाचा तरी आधार लागतो. आम्ही कार्यकर्ते आहोत आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीच कसलीही भीती नसते, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः भाऊ म्हणतात नातं नाही,बहीण म्हणते वैर नाही! मुंडे भावा-बहिणींमध्ये चाललंय काय?)

कार्यकर्त्याच्या मागे जनतेची शक्ती

कार्यकर्ता पद कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आमदारकी,खासदारकी,मंत्रीपद ही पदं जातील पण कार्यकर्ता पद कधीही जात नाही. कार्यकर्ता जसजसं काम करतो तशी त्याला जनतेची शक्ती मिळत जाते आणि त्याची गाडी राजकारणात सुरळीतपणे चालते. पण एकदा का जनतेने नाकारलं की त्यांना कोणीही वाचारत नाही, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.