आता नवाब मलिकांकडून वानखेडेंच्या आई बनल्या ‘टार्गेट’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूचे कागदपत्रे उघड करून त्यांच्या दोन ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका ठिकाणी वानखेडे यांची आई हिंदू म्हणून उल्लेख आहे, तर अंत्य संस्कारासाठी मुस्लिम म्हणून नोंद करण्यात आली आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यासंबंधीचे कागदपत्रे यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहेत.

काय आहेत कागदपत्रे?

महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रे नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.

मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केले. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी याआधीच स्पष्ट केले होते.

वानखेडेंचा फोटो केलेला ट्वीट

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत आहेत. त्यासंदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम धर्मगुरुंच्या समोर सही करताना दिसत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here