Cabinet Portfolio Allotment : शिंदे-पवार यांना एक एक महत्त्वाचे अतिरिक्त खाते

85
– सुजित महामुलकर 
गेले सहा दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटप (Cabinet Portfolio Allotment) शनिवारी २१ डिसेंबर २०२४ या दिवशी म्हणजेच नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक एक महत्वाचे अतिरिक्त खाते देऊन त्यांना यानंतर नाराजीचा सूर काढण्याची संधी राहणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसते.

गृह मुख्यमंत्र्यांकडेच 

खातेवाटपावर (Cabinet Portfolio Allotment) भाजपाचा वरचष्मा असून शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे मागच्या सरकारमध्ये असलेली बहुतांश खाती, अपवाद वगळता, कायम ठेवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पूर्वी असलेली अनुक्रमे नगरविकास आणि अर्थ ही मोठी खाती कायम ठेवण्यात आली आहेत तर शिंदे यांनी आग्रह केलेले गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवले आहे.

शिंदे यांना गृहनिर्माणही 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक एक महत्वाचे अतिरिक्त खाते देत ते नाराज होणार नाहीत  याची काळजी घेतली असल्याचे दिसून येते. शिंदे यांना नगरविकास याव्यतिरिक्त गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपक्रम तर अजित पवार यांना अर्थ खात्यासोबत राज्य उत्पादन शुल्क विभागही देण्यात आला आहे.

राज्याचे आरोग्य कोल्हापूरवर 

कोल्हापूर जिल्ह्यावर आरोग्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण तर शिवसेनेचे प्रकाश अबीटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Cabinet Portfolio Allotment)

महिला बाल कल्याण तटकरे कायम 

भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर माहिती आणि तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्यची जबाबदारी देण्यात आली तर मुंबईचे दुसरे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर पुन्हा कौशल्य विकासची धुरा देण्यात आली असून पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशू संवर्धन तर त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यावर अन्न आणि नागरी पुरवठा खाते असेल. महिला बाळ कल्याण यावर आदिती तटकरे या कायम असतील. (Cabinet Portfolio Allotment)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.