Cabinet Reshuffle : मंत्रिमंडळ फेरबदलात काहींना मुक्त करून संघटन कार्यात जुंपणार? कोण आहेत ते मंत्री?

135
Cabinet Reshuffle : मंत्रिमंडळ फेरबदलात काहींना मुक्त करून संघटन कार्यात जुंपणार? कोण आहेत ते मंत्री?

राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. हा विस्तार होत असताना मंत्रिमंडळ फेरबदलही होणार असल्याच्या चर्चाना यानिमित्ताने उधाण आले आहे. फेरबदल करत असताना काहींना मंत्रीपदावरून मुक्त करत विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षकार्याची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात काही नावे समोर येत आहेत. (Cabinet Reshuffle)

फडणवीसांची इच्छा

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित फटका बसल्यानंतर राज्यातील भाजपाचा चेहेरा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मंत्रीपदावरून मुक्त पक्षकार्य करण्याची संधी द्यावी, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली होती तसेच केंद्रीय नेतृत्वाकडेही तशी मागणी केली होती. मात्र ती मागणी मान्य झाली नाही. (Cabinet Reshuffle)

सरकारचे ‘संकटमोचक’

राज्यात लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभेला झालेल्या चुका दुरुस्त करून संघटन अधिक मजबूत करण्यावर राज्यातील भाजपाचा भर आहे. याकामासाठी काही विश्वासातील, सक्रिय नेत्यांची गरज असल्याने मंत्रिमंडळातील भाजपा सरकारचे ‘संकटमोचक’ आणि फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू अशी ओळख असणारे गिरीश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Cabinet Reshuffle)

(हेही वाचा – vaghankhe: शिवरायांची वाघनखे मुंबईत दाखल! साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भव्य सोहळा होणार)

वारीच्या नियोजनातही महाजन

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना (२०१४-२०१९) सरकारच्या विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना अनेकदा महाजन सामोरे गेले आणि सरकारविरोधी रोष थंड केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग ते कांदा उत्पादकांचे आंदोलन असो की आदिवासी समाजाचा मोर्चा, पक्ष कार्यकर्त्यांची, नेत्यांची नाराजीपासून ते मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलन असो, भाजपा नेतृत्वाखालील सरकारच्या सगळ्या अडचणीच्या वेळी धाऊन जाणाऱ्या महाजन यांची संकटमोचक अशी ख्याती निर्माण झाली आहे. नाशिक कुंभमेळापासून ते आजच्या बुधवारी आषाढी एकादशीची पंढरपूर यात्रा असो, महाजन आघाडीवर आहेतच. यंदा प्रथमच आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी एक समिती नेमली आहे. या समितीमध्येदेखील गिरीश महाजन यांचा समावेश आहे. गेली तीन-चार दिवस महाजन वारीच्या नियोजनासाठी पंढरपुरात तळ ठोकून आहेत. महाजन यांच्याशिवाय अजूनही काही मंत्री आणि नेत्यांची चाचपणी पक्षाकडून करण्यात येत असून मंत्रिमंडळ फेरबदल करताना ती नावे समोर येतीलच. (Cabinet Reshuffle)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.