CAG report : तृणमूल काँग्रेस सरकारवरील २ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

249

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लेखपरिक्षकांनी (CAG report) अहवालात म्हटले होते की, बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमध्ये १ लाख ९० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पैसे मिळाल्यानंतर आणि काम पूर्ण झाल्यानंतर, एक वर्षाच्या आत वापर प्रमाणपत्र द्यावे लागेल. ममता सरकारने १ लाख ९० सहस्र कोटी रुपयांचा वापर प्रमाणपत्र दिलेले नाही. यावरून बंगालमध्ये भाजपकडून आरोप, तर तृणमूलकडून प्रत्यारोप केले जात आहेत.

(हेही वाचा : Karnataka : कर्नाटकातील ४१६ वक्फ संपत्तींच्या रक्षणासाठी सरकारकडून ३१.८४ कोटी रुपयांचे अनुदान)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले होते. ‘मी वर्ष २००३ मध्ये सत्तेत नव्हते. वर्ष २०११ पासून अशा प्रकरणाचे माझे दायित्व आहे. २ लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच आरोप पूर्णपणे निराधार आहे. ‘कॅग’ची (CAG report) माहिती पूर्णपणे चुकीची आहे. हे भाजप पक्षाने लिहिले आहे. जर तुम्हाला हवे असेल, तर मी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रती पंतप्रधान कार्यालयाला पाठवू शकते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.