Calcutta High Court ने शुक्रवारी, १४ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कोलकाता येथील सभेला परवानगी दिली. या सभेला सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करणार आहेत. या सभेला राज्य सरकारने विरोध केला होता. माध्यमिकशालान्त परीक्षा सुरु आहेत, लाऊडस्पीकर वापरामुळे यात व्यत्यय येऊ शकतो, असे कारण राज्य सरकारने दिले होते, पण न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावला.
सभेला परवानगी देताना न्यायालयाने Calcutta High Court नमूद केले की, हा कार्यक्रम रविवारी होणार आहे आणि फक्त १ तास १५ मिनिटे चालणार आहे. माध्यमिक परीक्षा सुरू आहे. तथापि, हा कार्यक्रम रविवारी सुट्टीच्या दिवशी आणि तोही फक्त १ तास १५ मिनिटांसाठी आयोजित करण्यात आला असल्याने आणि राज्य प्रतिवादींच्या सूचनेनुसार, परिसरातील सर्वात जवळची शाळा एसएआय संकुलापासून जवळजवळ ५०० मीटर अंतरावर ही सभा होणार आहे, त्यामुळे परीक्षेच्या वेळी परीक्षार्थींना कोणताही अडथळा किंवा त्रास होऊ नये यासाठी किमान आवाज सुनिश्चित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
(हेही वाचा आघाडीत होणार बिघाडी! उद्धव ठाकरेंना Congress देणार मोठा झटका?)
न्यायालयाने Calcutta High Court याचिकाकर्त्याला परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून कमीत कमी आवाज सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्या संघाचे जिल्हा कार्यवाह यांनी म्हटले आहे की, सरसंघचालक मोहन भागवत हे १६ फेब्रुवारी रोजी वर्धमान येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण संकुलात स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना संबोधित करणार आहेत. कार्यक्रमस्थळाला मंजुरी देण्यात आली असताना, पर्यावरण विभागाने मायक्रोफोन किंवा लाऊडस्पीकर परवानगी नाकारली.
याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की लाऊडस्पीकरशिवाय भाषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही. मात्र यातील आवाजही क्षमता मर्यादित असेल, असा विश्वास आयोजकांनी दिला आहे. याचिकेत असे म्हटले आहे की कार्यक्रमस्थळाजवळील दोन शाळा सुमारे १ आणि २ किमी अंतरावर आहेत आणि रविवारी होणारा कार्यक्रम परीक्षेत व्यत्यय आणणार नाही.