बांगलादेशी घुसखोरांना कोलकातातून मदत; मंत्री Yogesh Kadam यांचा दावा

47
राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर; उपाययोजना करण्याचे गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचे आश्वासन

बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना मदत करणाऱ्यांना कधीही गय केली जाणार नाही, असे विधान राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केले. कदम पुढे म्हणाले की, बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना कागदपत्रे पुरावे मिळण्यासाठी कोलकत्ता मधूनच मदत होते. त्यामुळे त्यांना भारतात (India) वास्तव करण्याची संधी मिळते, असा दावा देखील कदम यांनी केला. राज्याचे महसूल आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे दि. २८ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावरती आले होते.

( हेही वाचा : Delhi Assembly Election : मराठी भाषिकांची मते मिळविण्यासाठी BJP चे राज्यातील नेते सज्ज

यावेळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले की, बांगलादेशी नागरिक हे देशाच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून धोका नायक आहे आणि महायुती (MahaYuti) सरकारचा या धोक्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे सुरू झालेले आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे कदापीही सहन करणार नाही, असे स्पष्ट करून मालेगाव (Malegaon) मधील प्रकरणांमध्ये ही बाब कठोर भूमिका कदम यांनी घेतली. अशा बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची शासन गय करणार नाही, असा इशाराही कदम (Yogesh Kadam) यांनी दिला.

राज्यातील तहसीलदार व इतर सह वर्गातील अधिकाऱ्यांनी जन्म दाखले देण्याच्या प्रक्रियेला विरोध केला असून त्या प्रकरणात हा अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे त्यावर अजून पर्यंत शासनापर्यंत हे निवेदन आलं नसून ते मिळाले तर योग्य विचार केला जाईल, असं मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सांगितले. ते म्हणाले की, महसूल विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी म्हणून शासन सर्व स्तरावरचे प्रयत्न करीत असून त्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. (Yogesh Kadam)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.