महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनेत संशोधन करण्याची गरज आहे. यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून संशोधन करण्याची मागणी शिवसेनेच्या (उबाठा) शिष्टमंडळाने राष्ट्रपती यांच्याकडे केली. (Maratha Reservation)
राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या (उबाठा) शिष्टमंडळाने शनिवारी (१८ नोव्हेंबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि तरूण बेरोजगारीने त्रस्त आहे. एवढेच काय तर, महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. (Maratha Reservation)
राज्यात मराठा आणि धनगर समाज आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. त्यांना आरक्षण द्यायचे झाले तर सध्या ज्यांना आरक्षण दिले आहे त्यांच्या आरक्षणात कपात करावी लागेल. कारण, राज्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार नाही. हा अधिकार फक्त संसदेला आहे. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Delhi Chhath Puja : छठपूजेसाठी दिल्ली वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी)
यामुळे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त करण्याची गरज आहे. यासाठी आपण केंद्र सरकारला सूचित करावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळात खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, सुनिल प्रभू, अनिल परब, संजय जाधव, अजय चौधरी आणि अंबादास दानवे यांचा समावेश होता. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community