राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राष्ट्रपतींचा ‘गरीब बिचारी’ असा उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. हा राष्ट्रपती पदाचा अवमान असल्याचे सत्ताधारी म्हणत आहेत. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. बिहारच्या मुझफ्फर नगर येथील मुख्य महान्यायदंडाधिकारी न्यायालयात पोहचले आहे. या न्यायालयात या प्रकरणी सोनिया गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील वकील सुधीर ओझा यांनी ही तक्रार केली आहे. सोनिया गांधींवर (Sonia Gandhi) देशाच्या सर्वोच्च संवैधानिक संस्थेचा ‘अनादर’ केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीत राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारण सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राष्ट्रपतींचा अवमान करताना राहुल आणि प्रियंका या दोघांनीही याचे समर्थन केल्याने तेही यात दोषी असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खटला दाखल केला पाहिजे, अशीही मागणी यात करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सोनिया गांधी काय म्हणाल्या होत्या?
३१ जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदेत अभिभाषण केले. त्यानंतर सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) या भाषणाविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, राष्ट्रपती भाषण करताना शेवटी खूप थकल्या होत्या…बिचाऱ्या, त्यांना बोलताही येत नव्हते’, असे म्हणाले होते. तर राहुल गांधी यांनीही भाषण ‘कंटाळवाणे’ आणि ‘पुनरावृत्ती’ असे वर्णन केले, तर प्रियंका गांधी वाड्रा यांनी भावंडांच्या आईचा बचाव केला.
Join Our WhatsApp Community