निवडणूक काळात सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना व्हाटसअप ग्रुप वरून एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडणार आहे. सरकारी कर्मचारी-अधिकारी यांना निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रचार करता येत नाही. (Loksabha Election 2024)
तरीही काही कर्मचारी उघडपणे अथवा सोशल मीडियावर एखाद्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट व्हायरल करतात. निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असूनही सरकारी कर्मचार्यांकडून असे प्रकार घडतात. यंदा निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष असून सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून प्रचाराचे प्रकार घडल्यास थेट निलंबनाची कारवाई होणार आहे.
एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. व्हाट्सअप ‘द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील कलम ३ व ४ कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात अशा प्रकरणात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली आहे. थेट निलंबनाची कारवाई केल्याने राज्यातील इतर सरकारी अधिकारी-कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे. निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराचा प्रचार होणार नाही, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Loksabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community