शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत आज पुन्हा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलटतपासणी सुरू आहे. (MLA Disqualification Case) आजही या प्रकरणी एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना सुनील प्रभू यांची बरीच दमछाक झाल्याचे दिसून आले. जेठमलानी यांनी 22 जून 2022 रोजीच्या पत्राबाबत प्रश्नांची सरबत्ती केली.
(हेही वाचा – Rajya sabha New Rule : संसदेचे हिवाळी अधिवेशन, खासदारांनी पालन करायच्यात ‘या’ सूचना)
ईमेल २२ कि २३ जूनचा ?
‘तुम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ईमेल पाठवला कि पत्र ? तुम्ही प्रथम पत्र सांगितले, नंतर ईमेल पाठवल्याचा दावा केला. खरे काय ?’, अशी विचारणा जेठमलानी यांनी केली. त्यावर प्रभु गोंधळले. ‘मला ईमेल लेटर म्हणायचे राहून गेले. त्यात मी केवळ पत्र म्हणालो. सर्वकाही ऑन रेकॉर्ड आहे’, असे सुनील प्रभु यांनी सांगितले.
सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांना एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी पाठवलेले पत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी 23 जून 2022 रोजी पाठवलेला ईमेल सादर केला. याविषयीही उलटतपासणी झाली. पत्र नेमके २२ जूनचे कि २३ जूनचे, असे विचारल्यानंतर प्रभु यांनी ”मी 22 जून 2022 रोजी पत्र पाठवण्याची सूचना केली होती. पण ते पाठवण्यास उशीर झाला असेल. त्यामुळे त्याच्यावर 23 तारखेचा उल्लेख असेल”, असे स्पष्टीकरण दिले.
(हेही वाचा – Rajya sabha New Rule : संसदेचे हिवाळी अधिवेशन, खासदारांनी पालन करायच्यात ‘या’ सूचना)
ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येते का ?
‘शिवसेनेमध्ये ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख (ShivSena) होता येते का’, असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारल्यानंतर ‘सेनेच्या घटनेमध्ये जे आहे, त्यानुसार नियुक्ती केली जाते’, असे उत्तर सुनील प्रभु यांनी दिले. शिवसेनेची घटना त्यांच्या विचारधारेशी विरुद्ध अशा पक्षाशी युती करण्याची मुभा देते का, असा प्रश्नही जेठमलानी यांनी विचारला. त्यावर सुनील प्रभू यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.
या वेळी शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी झालेली निवड वैध नाही, असा दावा जेठमलानी यांनी या सुनावणीदरम्यान केला. या प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या, १ डिसेंबरपासून शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांची सुनावणी सुरू होणार आहे. (MLA Disqualification Case)
हेही पहा –