लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात? निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे संकेत

170
लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात? निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे संकेत
लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात? निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे संकेत

महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष त्यात भाजपा असो किंवा महाविकास आघाडी असो लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु आता लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका देखील लागू शकतात असे संकेतच निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे वाटत आहेत. २०२४ रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी देखील निवडणूक आयोगाकडून केली जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनंतर राज्य निवडून आयोगाचे मुख्य अधिकारी यांनी तसे आदेश काढले आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या या आदेशात म्हटले आहे की, आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामकाजाची जबाबदारी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने तिथल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या कर्मचारी वर्गावरच असते. भारतीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पूर्वतयारीसाठी ठरलेल्या योजनेनुसार सर्व कामे वेळेत व्हावीत यासाठी निवडणूक शाखेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे ज्यात त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा –  New Parliament building : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर शरद पवारांची टीका; म्हणाले…)

पुढच्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०२४ला लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आता कामाला लागले आहे. परंतु राज्यात असलेल्या अस्थिरतेच्या वातावरणाला पाहून आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये बोलल्या जात असलेल्या लवकरच निवडणुका होतील या अनुषंगाने निवडणूक आयोग कामाला लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.